अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत व भारताबाहेर विदेशातही संत विचाराबद्दल आदर आस्था भक्ती अथवा अभ्यासू वृत्ती असलेले भारतीय लोक अथवा अन्य देशातील लोक यांना संघटित करून संत विचाराचा प्रचार व प्रसार करणे अशाप्रकारे या अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे वरील पद्धतीने कार्य करण्यासाठी ही संस्था सतत प्रयत्नशील आहे
१) धर्म संसद अ) धर्मसभा ब) धर्म परिषद क) कार्यकारी मंडळ.
केंद्रशासीत कमिटी १) संतसभा २) कार्यकारी मंडळ.
राज्यस्तरीय कमिटी १) संतसभा २) संतपरिषद ३)कार्यकारी मंडळ
विभागीय कमिटी भक्त सभा.
जिल्हा स्तरीय कमिटी जिल्हा भक्त परिषद
तालुका स्तरीय कमिटी तालुका भक्त समिती
ग्रामस्तरीय कमिटी ग्रामशाखा तथा भक्त शाखा
अखिल भारतीय वारकरी मंडळ डिकसळ. ता.केळंब. जि.उस्मानाबाद र.न.ई.२३१(३) या संस्थेच्यामार्फत २००३ सालापासुन खालीलप्रमाणे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासांचा मागोवा घेत व भाष्यकाराते वाटपुसत अशा पद्धतीने अद्वैत तत्वज्ञानाचे माध्यमातुन हरिहर ऐक्याची भक्ति मार्गावरील वाटचाल अधिक व्यापक, मजबूत व पूढे भविष्य काळातही चालत राहिल. एवढी मोठी त्रिकालावाधीत सत्याची सिद्धांत सरिता विशाल प्रवाहामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा इत्यादी ऋतुचा कसलाही परिणाम न होणारी ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ अशीही ज्ञानगंगा प्रवाहित केली. त्याचवरोवर मानवी जीवनाचे आदर्श जीवन पद्धतीसाठी अनमोल अशा जीवनमुल्याची आपल्या वाङ्मयात पखरण केलेली दिसून येते. याच बरोबर निसर्ग साहित्य अशा हजारो विषयावद्दल कोणत्याही विचारवंत अथवा धुरीनांचे मनामध्ये न उभे राहणाऱ्या अशा अनेक विषयांना सोन्याच्या अंगठीतील हिऱ्याप्रमाणे शब्दांकित करून ही ग्रंथसंपदा ज्ञानभक्ती व हजारो जीवनमूल्यरूपी पक्वांनानी भरलेले कैवलरुपी गोड पदार्थांचे ताट जनकल्याणासाठी निर्माण करून ठेवले आहे. तोच विचार व साधना त्यांच्या समकालीन व पुढील संत मंडळीने आपले अनुभवातून त्यात कांही भर घालुन चालवला व त्या विचाराचे जगद्गुरू तुकाराम महाराज कळस झाले. ही विचारधारा जनता जनार्धनाच्या कल्याणसाठी आपले अंगातील रक्ताचे प्रत्येक थेंबाप्रमाणे व जीवनातील प्रत्येक श्वासाप्रमाणे जपली आहे व साधुसंतांचे पाईक आजही जपत आहेत. हाच विचार पुढे जपण्यासाठी सादक मंडळी खुप परिश्रम घेत आहेत. याला कांहीका होईना संघटनात्मक स्वरूप यावे म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाने केंद्रीय कमिटी ते ग्राम कमिटी पर्यंतचे पद्धतीने कार्य चालु केलेले आहे. याचा उद्देश एवढाच आहे की,
१) समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणे
२) धार्मिक व धर्मादाय स्वरूपाच्या कार्याचे आयोजन करणे
३)भजन, कीर्तन, भारूड, कथा, प्रवचन, हरिपाठ, अखंड हरिनाम सप्ताह इ. कार्याचे आयोजन करुन तमाज प्रवोधन करणे,
४)गायन व वादन कलेचे प्रशिक्षण देणे,
५) आराध्य देवतांच्या मंदिराची उभारणी करणे.
६) देवाची जयंती व संतांची पण्यतिथी साजरी करणे,
৩) इतर ठीकाणी चाललेल्या धार्मिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करणे,
८) अंधश्रद्धा निर्मूलन करण्वाया प्रवत्न करणे.
९) व्यसनमुक्ती कायाक्रमाचे आयोजन करणे
१०) वृद्धाश्रम चालवणे
११) अनाथ व असह्य व्यक्तीची मदत करणे,
१२) कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, अल्पबचत , लसीकरण मोहीम इ. प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे,
१३) सांस्कृतिक उत्सवासाठी व संत विचार प्रशिक्षणासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळा व महाविद्यालयात चालविणे, तसेच भजन, कीर्तन प्रशिक्षणाकरिता महाविद्यालय चालविणे, गुरुकूल पद्धतीने पाठशाळा चालविणे.
१४) संत संमेलन -
अ) केंद्रीय पातळीवर देशभरातील सर्व साधुसतांचे पाच वर्षातून एकदा सत संमेलन आयोजित करणे.
ब) राज्य पातळीवर त्या त्या राज्यात ४ वार्षातून एकदा संत संमेलन आयोजित करणे.
क) केंद्रशासित प्रदेशात त्या त्या प्रदेशातील साधुसंतांचे ४ वर्षांतन एकदा संत संमेलन आयोजित करणे.
ड) विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर त्या त्या विभागातील जिल्हा व तालुक्यातील साधुसंतांचे ३ वर्षातून एकदा संत संमेलन आयोजित करणे.
ई) जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणामध्ये दोन वर्षातून एकदा वारकरी मेळावा आयोजित करणे.
१५) अधिवेशन - या मंडळाच्या केंद्रीय कमिटीचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कमिटीचे वर्षातून एकदा त्यांच्या त्यांच्या पातळीवर अधिवेशन घेतले जाईल.
१६) लोकशिक्षण व प्रबोधनार्थ, गरजेनुसार व मंडळाच्या आर्थिक कुवतेनुसार देनिक, साप्ताहीक व मासिक इतर नियतकालीके चालवणे.
१७) संत वाड्मयाचे भारतातील व शक्य तो जगातील सर्व भाषेत भाषांतर करून त्याचे प्रकाशन करणे, वेळोवेळी पुस्तक रुपाने विचार प्रगट करणे, तसेच देश विदेशातील वारकरी विचारांच्या व्यक्तींचे संघटन करणे.
१८) संत तीर्थ, भक्त तीर्थ व देवस्थाने यांची अपेक्षित व्यवस्था उभारणे अथवा उभारण्यास भाग 4. पाडणे. सहकार्य करणे अथवा करण्यास भाग पाडणे.
१९) सांप्रदायातील साधन सुचिता व पारदर्शकता प्रस्थापित करणे.
२०) महापूर, अग्नी, भूकंप, ज्वालामुखी, वादळ, इ. नैसर्गिक आपत्ती तसेच मानवनिर्मित आपत्तीत सापडलेल्या संकटग्रस्तांना आधार देणे.
२१) वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे.
२२) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
२३) रोग निदान शिबीर आयोजित करुन गरजूंना मोफत औषधोपचार करणे.
२४) वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करणे.
२५) वधू-वर मेळावे आयोजित करुन सामुहिक विवाहाचे आयोजन करणे. बालसंस्कार केंद्र चालविणे.
२६) संत वाड्मयाचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या व्यक्ती व व्यक्तीसमुहाचा अथवा शंस्थानचा सत्कार करणे, गौरव करणे आणि पुरस्कार देणे.
२७) अंध व अपंगांना सुविधा उपलब्ध करुन देणे.
२८) महिलांचा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विकास करणे.
२९) व्यायामशाळा व ध्यानमंदिर बांधणे.
३०) वसतीगृह चाऱळणे.
३१) सांप्रदायामध्ये सर्वांना एखादे तरी सामुहिक व्यासपीठ असावे की ज्यामुळे सर्वांना एकत्र येऊन सांप्रदायाचे कार्यासाठी त्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी व आवश्यक असलेली संघटनात्मक कार्याची वज्रमृठ असणे गरजेचे असते ती गोष्ट यामुळे साध्य होईल. समाजामध्ये दुर्जन जास्त नाहीत पण सज्जन संघटीत नाहीत. हीच खरी खंत आहे. त्याकरीता अशा संघटनात्मक वाटचालीची समाजाला गरज आहे.
३२) अध्यात्मिकते बरोबरच अनेकांचे ठिकाणी असलेली सामाजिक बांधिलकीची इतरांना जाणीव होईल.
३३) नवोदितांना आपल्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव मिळुन ते विकसीत करण्याची संधी मिळेल.
३४) कुस्ती खेळणारा पहिलवान, क्रिकेट इत्यादी खेळ खेळणारे खेळाडु हे म्हणत असतात की आम्ही जिल्हा स्तरीय, राज्यस्तरावर खेळलो त्यामुळे त्यांचे सामाजिक स्थान दिवसेंदिवस वाढत जाते व त्यामुळे ते अधिक ताकतीने त्या क्षेत्रातील लक्षापुढे केंद्रीत होऊन नैपुण्य वाढवुन पुढील पिढी समोर आपला आदर्श निर्माण करून ठेवतो. त्याची प्रेरणा घेऊन पुढची पिढी चालते व त्या क्षेत्रातील इतिहासाचे सोनेरी पान ठरते. त्याप्रमाणे अध्यात्माचे क्षेत्रात काम करणारासही पुढील पद्धतीने हरि, गुरू व संतकृपेने वरिष्ठाचे सहकार्याने व स्वत:चे ठिकाणी असलेल्या विशेष गुणाने व परिश्रमातुन त्याला याही क्षेत्रात पुढील प्रगती साधता येईल.
३५) या सांप्रदायात काम करणाऱ्या व्यक्तिस या व्यासपीठामुळे सर्वदुर परिचित होऊन उत्तम पद्धतीने काम करता येईल.
३६). यामध्ये सर्व जातीजमातीचे मंडळी समाविष्ठ आहेत. महिला युवक असे सर्व समावेशक प्रतिनिधी असल्यामुळे सांप्रदायामध्ये सर्वसमावेशक अशी विचारधारा विद्यमान परिस्थितीमध्ये कसे कार्य करत आहे याचा आनंद जनता जनार्धनास मिळेल.
३७) ज्येष्ठांचा सन्मान होऊन त्यांच्या अनुभवाचा, त्यांचे विचारांचा व आशीर्वादाचा लाभ सर्वांना मिळेल. तरूण पिढीतील सांप्रदायीक मंडळींना आधार मिळेल. (78)
३९) शासन रतरावरील विविध योजनेचे लाभधारक होता येईल.
४०) या सर्व कार्यपद्धतीमुळे समाजामध्ये शांतता सुव्यवस्था प्राप्त होण्यास मदत होईल.
४१) मंडळाने काढलेल्या श्री संत ज्ञानदेव तुकाराम महाराज या ज्ञानपीठामुळे समाजातील सर्व स्तरापर्यंत संत वाङ्मय व भारतीय संस्कृतीची शिकवण मिळण्यास मदत होईल.
४२) वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमामुळे परस्परांचा परिचय वाढेल. त्यामुळे एकमेकांची एकमेकांना वेळोवेळी मदत मिळेल, सहकार्य होईल.
४३) मोठ्या मंडळीचे एकमेकांचे परिचय व संबंध वाढल्यामुळे त्यांचे मुलांचेही एकमेकांचे परिचय वाढतील व त्यापुढच्या युवा पिढींना एकमेकांचे मार्गदर्शन मिळेल, सहकार्य होईल.
४४) प्रत्येकास वैयक्तिक जीवनाबरोबर सामाजिक बांधिलकीने जीवन जगण्याची विचारधारा रूजेल. एकमेकांस त्याचा फायदा होईल.
४५) आपण लोकांत वागल्यामुळे माणसाच्या विचारांच्या कक्षा वाढतात. विचारांमध्ये व्यापकता येते. अशा व्यक्ती समाजजीवनास मार्गदर्शक व आधार ठरतात.
४६) महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते व त्यामुळे त्यांचा परिचय वाढतो. विचारांची देवाण घेवाण होते. वेगवेगळ्या भागात असलेल्या प्रथा परंपरा एकमेकांना माहित होतात. महिलांचा एकमेर्कींचा परिचय वाढला तर त्यांच्या मुली मुलींमध्ये एक मैत्रिणीचे नाते निर्माण होते. त्यामुळे एकमेर्कीचे विचारांची देवाण घेवाण होते. पुर्वाचे काळात महिला फक्त चुल आणि मुल एवढेच पाहत होत्या. आता स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण घराघरात पोचले आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षणापासून ते मूली संरक्षण मंत्री, अर्थमंत्रीपदापर्यंत एवढेच नव्हे तर राष्ट्रपती पदापर्यंत गेल्या. त्यामुळे शालेय जीवनातील मैत्रीणीचा मुलींना भविष्यकाळात किती फायदा होईल याचा अंत आपणास लावता येणार नाही.
४७) युवकांचेही संघटन या मंडळामध्ये असल्यामुळे ही युवापिढी सांप्रदायाचे कार्यात असल्यामुळे ते सत्संगात राहून व्यसनमुक्त व सदाचारी बनतील, त्यांचेमध्ये आपले धर्म, संस्कृती, सांप्रदायाचा व या भारत मातेचा स्वाभिमानी राहून सांप्रदाय व धर्मसंस्कृतीवर येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्याची त्यांची विचारधारा या भारतीय संस्कृतीला व भारतमातेला सार्थ अभिमान वाटण्यासारखे घडेल. अशा शेकडो फायद्याची गंगा समाजामध्ये सतत वाहत राहिल.
४८) केवळ सत्ता असेल तरच आपणास समाज सेवा करण्याचा आसेल . असे नाही तर सत्ता नसली तरी त्यांचा करत राहील हेतु सत्य व सामाजिक बांधीलकी ने लोक हिताचे काम करत राहिले तर आपणास खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करता येते. अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढेल, केवळ सत्तासंपत्तीनेच माणसे मोठे होतात असे नाही तर, जीवनामध्ये मिळालेल्या सद्गुणांच्या संपत्तीनेही तथा त्यागानेही माणसे खूप मोठे होतात. योग्याची संपदा त्याग आणी शांती/उभय लोकी सोहळा कितीमान ।तुकाराम महाराज।। अनेक साधु संत, साहित्यिक विचारवंत, समाजसुधारक देशभक्त यांच्याकडे कुठे संपत्ती हवी त्या प्रमाणात होती का, तर नव्हती परंतु सगळे संपत्तीवाले लोक त्यांचे पिढ्यान् पिढ्या पाईक होऊन आदराने त्यांच्या विषयोचा स्वाभीमान बाळगून आपले जीवन जगत असतात. अशी विचारधारा लोकांमध्ये रुजत राहावी हाच हेतू आहे.